भांडुप मुंबईच्या नवीन शहरी लँडमार्क म्हणून केंद्रस्थानी
मुंबईची रिअल इस्टेट चर्चा प्रामुख्याने तिच्या प्रस्थापित परिसरांभोवती फिरते. साऊथ मुंबईचे वारसा आकर्षण, पोवईची नियोजित जागा किंवा बांद्र्याची सर्जनशील ऊर्जा. तरीही, भांडुपमध्ये एक शांत परिवर्तन घडत आहे, एक असे ठिकाण ज्याची एकेकाळी औद्योगिक ओळख होती
भांडुप मुंबईच्या नवीन शहरी लँडमार्क म्हणून केंद्रस्थानी येत आहे


मुंबईची रिअल इस्टेट चर्चा प्रामुख्याने तिच्या प्रस्थापित परिसरांभोवती फिरते. साऊथ मुंबईचे वारसा आकर्षण, पोवईची नियोजित जागा किंवा बांद्र्याची सर्जनशील ऊर्जा. तरीही, भांडुपमध्ये एक शांत परिवर्तन घडत आहे, एक असे ठिकाण ज्याची एकेकाळी औद्योगिक ओळख होती परंतु आता ते एका नवीन गतिशील टप्प्यात प्रवेश करत आहे. विकसित होत असलेली पायाभूत सुविधा, मुबलक हिरवाई आणि वाढती समुदाय भावना यामुळे ते मुंबईतील सर्वात सुजोडलेले आणि संतुलित निवासी गंतव्य म्हणून उदयास येत आहे.

भारतातील रिअल इस्टेट परिदृश्य शांत पण महत्त्वपूर्ण पुनर्संतुलनातून जात आहे. आजचे घरखरेदीदार फक्त चौरस फूट शोधत नाहीत. ते अनुभव शोधत आहेत, ज्या जागा आराम, जोडणी आणि सुविधा एकत्र आणतात. मुंबईसारख्या शहरांमध्ये हा बदल विशेषतः स्पष्ट आहे. जिथे सुविधा आणि जीवनाची गुणवत्ता एकत्र येतात तिथेच सर्वात जीवन्त समुदाय तयार होतात. भांडुप हे त्या संतुलनाचे उत्तम उदाहरण आहे, जे सुलभ प्रवास, हिरवाईचा प्रवेश आणि महानगरातील धावपळीत दुर्मिळ झालेली शांतता देते.

शहरभर अखंड प्रवेश

या ठिकाणाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची कनेक्टिव्हिटी. सेंट्रल रेल्वे लाईनलगत असलेले स्थान आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, एलबीएस मार्ग आणि येऊ घातलेल्या मेट्रो नेटवर्कद्वारे मजबूतपणे जोडले गेलेले असल्यामुळे रहिवाशांना व्यावसायिक केंद्रे आणि विरंगुळ्याच्या गंतव्यांना सहज पोहोचता येते. मुंबईच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या जवळ असल्यामुळे हे विशेषतः व्यावसायिक आणि वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी आकर्षक बनते. हे फक्त अंतराचे प्रकरण नाही, तर दैनंदिन प्रवास किती सहज होतो याचे आहे. जेव्हा एखादा परिसर अनेक प्रवास पर्याय देतो तेव्हा तो फक्त सुविधा पुरवत नाही तर शहरी जीवनाचा एकूण अनुभव उंचावतो.

शहरी जीवनातील हिरवाईचा लाभ

भांडुपची एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे निसर्गाशी असलेला खोल संबंध. उद्याने, तलाव आणि वनक्षेत्रांनी वेढलेला हा परिसर मुंबईत क्वचितच आढळणारी मोकळीक आणि शांतता देतो. मध्यवर्ती ठिकाणी असूनही या भागाने सन्जय गांधी नॅशनल पार्कची हिरवाई आणि विहार तलावाच्या शांत पाण्यामुळे निसर्गाशी एक विलक्षण नाते जपले आहे. इथे एखादा व्यक्ती कामाचा दिवस संपवून काही मिनिटांतच हिरवाईमध्ये शांतता शोधू शकतो. शहरातून बाहेर न जाता मन:शांती मिळवण्याची ही क्षमता भांडुपचे खरे आकर्षण बनते आणि त्याला एक शहरी आश्रयस्थान बनवते.

उदयास येणारा परिसर

ग्राहकांच्या दृष्टीकोनातून पाहता भांडुपची विशेषता म्हणजे राहणीमान आणि दीर्घकालीन मूल्य यांचा विकसित होत जाणारा समतोल. या परिसरात आधुनिक निवासी प्रकल्पांची वाढ दिसत आहे ज्यासह सुधारित नागरी सुविधा, रिटेल केंद्रे आणि जीवनशैलीच्या सोयी विकसित होत आहेत. सुप्रसिद्ध शाळा, रुग्णालये आणि मनोरंजन स्थळे सहज पोहोचण्याच्या अंतरावर असल्यामुळे हे शहरातील आवश्यक सुविधा अतिघनता किंवा अति-विकासाच्या तडजोडीशिवाय प्रदान करते.

घरखरेदीदारांसाठी विशेषतः तरुण व्यावसायिक आणि कुटुंबांसाठी हा परिसर वाढत्या मायक्रो मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देतो जो अजूनही मोकळेपणाची आणि नैसर्गिकतेची भावना टिकवून ठेवतो. अधिक भरगच्च परिसरांच्या तुलनेत भांडुपमधील मालमत्ता किंमती सध्या अधिक चांगले मूल्य देतात आणि मेट्रो विस्तार तसेच रस्त्यांच्या सुधारणांसारख्या पायाभूत प्रकल्पांच्या प्रगतीमुळे भविष्यातील वाढीची मजबूत शक्यता निर्माण होते.

विमलेंद्र सिंग, मुख्य व्यवसाय अधिकारी – निवासी, महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande