आमदार देवेंद्र कोठेंचा शिवसेनेच्या अमोल शिंदेंना शह
सोलापूर, 03 जानेवारी (हिं.स.)। महानगरपालिकेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. सत्ताधारी भाजप स्वतंत्र निवडणूक लढवत असून राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती झाली आहे. सत्ताधाऱ्यांमध्येच शह काटशहचे राजकारण पहायला मिळत आहे.2017 च्या महापालिका निवडणुक
आमदार देवेंद्र कोठेंचा शिवसेनेच्या अमोल शिंदेंना शह


सोलापूर, 03 जानेवारी (हिं.स.)।

महानगरपालिकेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. सत्ताधारी भाजप स्वतंत्र निवडणूक लढवत असून राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती झाली आहे.

सत्ताधाऱ्यांमध्येच शह काटशहचे राजकारण पहायला मिळत आहे.2017 च्या महापालिका निवडणुकीत एकत्र निवडून आलेले विद्यमान आमदार देवेंद्र कोठे आणि एकनाथ शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे आता एकमेकांचे विरोधक आहेत.

अमोल शिंदे यांनी युतीसाठी बराच प्रयत्न केला पण पालकमंत्री गोरे आणि आमदार कोठे यांनी प्रतिसाद दिला नाही.

म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची युती झाली. जागा वाटपामध्ये आमदार देवेंद्र कोठे यांच्या आत्या माजी नगरसेविका कुमुद अंकाराम यांना भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी प्रभाग तीन मधून शिंदे सेनेची उमेदवारी घेतली. यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना अमोल शिंदे यांनी कोठेंना हिणवताना ज्यांनी साथ सोडली त्यांच्या पाठीशी शिवसेना असल्याचे सांगत डिवचले होते. त्या उमेदवारीची सोलापुरात चर्चा झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande