
अकोला, 03 जानेवारी (हिं.स.)।
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदी संभाजी राजे आणि अपुर्वा सामंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे महाराष्ट्रातील क्रिकेट प्रशासनाला नवे नेतृत्व व दिशा मिळणार असल्याची चर्चा क्रीडावर्तुळात सुरू आहे.
अपुर्वा सामंत या आमदार किरण सामंत यांच्या कन्या असून त्या उच्च शिक्षित व तरुण उद्योजक म्हणून परिचित आहेत. सामाजिक व उद्योजकीय क्षेत्रातील त्यांचा सक्रिय सहभाग उल्लेखनीय ठरला आहे. त्यांच्या निवडीमुळे कोकणातील उदयोन्मुख युवक-युवतींसाठी क्रिकेट क्षेत्रात नव्या संधींची दारे खुली होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विशेषतः कोकण पट्ट्यातील ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळावे, स्थानिक स्तरावर क्रिकेट अकादमी, प्रशिक्षण सुविधा व स्पर्धा वाढाव्यात, यासाठी त्यांचा अनुभव उपयुक्त ठरेल, असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे. या निवडीमुळे कोकणातील युवा शक्तीला चालना मिळून महाराष्ट्र क्रिकेटच्या प्रगतीला गती मिळेल, असे मत व्यक्त करण्यात येत आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे