
अकोला, 03 जानेवारी (हिं.स.)।
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केले आहेत.. या आरोपाला आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.. मिटकरी यांनी चव्हाण यांना युती धर्म पाळण्याचे आव्हान केले आहे.. अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपने भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. मात्र, अजित पवार यांनी सर्वप्रथम स्वत:च्या पक्षाकडे पाहिले पाहिजे. ते नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील पक्षाबद्दल बोलत आहेत, हे त्यांनी ध्यानात ठेवावे. खरं तर आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवले पाहिजे. आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील, याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटले होते. यावरूनच भाजप आणि राष्ट्रवादी मध्ये जुंपल्याचे पहायला मिळत आहे.. आमदार अमोल मिटकरी म्हणाले, रवींद्र चव्हाण यांनी खुदके गिरेबाण में झाकणा चाहिए अशी डायलॉग बाजी करू नये.. त्यांनी महायुतीचा धर्म पाळावा असं आव्हान आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे..
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे