अकोल्याच्या महागावात शॉर्टसर्किटमुळे घराला आग; डोंगरे कुटुंबाचे लाखोंचे नुकसान.
अकोला, 03 जानेवारी (हिं.स.)। अकोल्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील महागाव गावात शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागल्याची घटना घडली. दरम्यान, सुरज डोंगरे यांच्या घरात अचानक लागलेल्या आगीत टीव्ही, फ्रीज, कुलर, दिवाण यांसह उपजीविकेचे साधन असलेले वेगवेगळ्या
अकोल्याच्या महागावात शॉर्टसर्किटमुळे घराला आग; डोंगरे कुटुंबाचे लाखोंचे नुकसान.


अकोला, 03 जानेवारी (हिं.स.)।

अकोल्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील महागाव गावात शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागल्याची घटना घडली. दरम्यान, सुरज डोंगरे यांच्या घरात अचानक लागलेल्या आगीत टीव्ही, फ्रीज, कुलर, दिवाण यांसह उपजीविकेचे साधन असलेले वेगवेगळ्या कंपनीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग कॅमेरे जळून खाक झाले. या आगीत अंदाजे पाच ते सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आग इतकी भीषण होती की, काळ्या धुराचे लोट दूरवर पसरले, त्यामुळे नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. काहींना किरकोळ जखमा झाल्याची माहिती आहे. यादरम्यान, घरमालक डोंगरे घरी नसताना ही आग लागली. अकोल्याच्या अग्निशामक दलाच्या पथक आणि ग्रामस्थांनी ही आग आटोक्यात आणली. दुसरीकडे शासनाने तातडीची मदत करावी, अशी मागणी डोंगरे कुटुंबाने केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande