
अकोला, 03 जानेवारी (हिं.स.)।
भाजपकडून आमदारकीसाठी तिकीट न मिळाल्यानंतर बंडखोरी करत वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी घेऊन विधानसभा निवडणूक लढवणारे हरीश अलमचंदानी पुन्हा चर्चेत आले आहेत. आगामी अकोला महानगरपालिका निवडणुकीत भाजपविरोधी बंडखोर अपक्षांना एकत्र करून त्यांनी तिसरी आघाडी उभारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ही तिसरी आघाडी फिस्कटली असून अलमचंदानी यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करत आपली उमेदवारी निश्चित करून घेतल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी केला आहे. तिसऱ्या आघाडीच्या नावाखाली अकोलेकरांना ब्लॅकमेल करण्यात आल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला असून या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे