अकोला : पोलिस अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
अकोला, 03 जानेवारी (हिं.स.)। अकोला पोलिसांची अब्रू वेशीवर टांगणारी घटना समोर आली आहे. रक्षक मानल्या जाणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याने तरुणीची छेड काढल्याचा आरोप करण्यात आलाय. बाळापूर पोलीस स्टेशनला या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. शंकर सुरेश बोंडे अ
P


अकोला, 03 जानेवारी (हिं.स.)। अकोला पोलिसांची अब्रू वेशीवर टांगणारी घटना समोर आली आहे. रक्षक मानल्या जाणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याने तरुणीची छेड काढल्याचा आरोप करण्यात आलाय. बाळापूर पोलीस स्टेशनला या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. शंकर सुरेश बोंडे असं तरुणीची छेड काढणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

पीएसआय बोंडे अकोल्यातील रामदास पेठ पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. बाळापुर पोलिसांनी तरुणीची छेड केल्याप्रकरणी अटक केली. तसेच त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र, या घटनेमुळे अकोला पोलीस दलात मोठी खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शहरातल्या बाबासाहेब प्रतिष्ठानचे बाजूला ही तरुणी भाड्याने राहते. आणि बाळापुर शहरातल्या नगरपालिकेत डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून कार्यरत आहे. नेहमीप्रमाणे येथे दररोज या ठिकाणी अकोल्याहून बाळापुर येथे राष्ट्रीय महामार्गाने अपडाऊन करतेे. नगरपालिका कार्यलयातील काम आटोपून बाळापूरहून अकोल्याकडे निघाली असता, वाटेतचं एक पोलीस अधिकारी तिच्या मार्गावर लागला. काही किमी अंतरावर तिचा पाठलाग करून थोडं दूर गाडी आडवी लावली, आणि तरुणीला म्हणाला की तुझ्या तोंडाचं सोड मला 2 मिनिटे बोलायचे आहे, आणि घाणेरडे तसेचं अश्लील इशारे हाताने करू लागला. त्यानंतर तरुणीने अकोला पोलिसांच्या डायल 112 वर कॉल केला. तिथे जुने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी दाखल झाले. फिर्यादी तरुणीला पोलीस मदत मिळाली आणि बाळापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. पुढ तरुणीच्या तक्रारीनंतर कलम 78,79,126(2) BNS नुसार गुन्हा दाखल करून छेड करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. शंकर सुरेश बोंडे असं या पीएसआयचं नाव असून तो मूळ पिंपळगाव राजा बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande