
बीड, 03 जानेवारी (हिं.स.)।
खेळ हे आता मोठं करिअर बनलं आहे. प्रत्येक क्षेत्रात खेळाडूंना सवलत आणि आरक्षण मिळतं. गेवराई तालुक्यात रणवीर पंडित यांनी क्रीडा चळवळीला गती दिली आहे. त्यांनी ठराविक व्हिजन ठेवून काम सुरू केलं आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून गुणवत्ता पुढे येते आहे. रणवीर पंडित यांच्या कामामुळे खेळाडू प्रेरित झाले आहेत, असे गौरवोद्गार गेवराई पोलीस स्टेशनचे निरीक्षक किशोर पवार यांनी काढले.
शिवाजीनगर गढी येथील शिवशारदा पब्लिक स्कूलच्या मैदानावर जयभवानी आणि जगदंबा
शिक्षण संस्था आयोजित क्रीडा महोत्सवात अॅथलेटिक्स स्पर्धांचा शुभारंभ झाला. या वेळी पोलिस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक दीपक लंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक आतकरे, अॅड. स्वप्निल येवले, सोशल मीडिया प्रमुख संदीप मडके, पोलिस हवालदार सुंदर राठोड, जयभवानी शिक्षण मंडळाचे सहप्रशासकीय अधिकारी प्रा. गोगुले, प्राचार्य संतोषकुमार अन्नम, प्रशासकीय अधिकारी अनंत डावकर उपस्थित होते.
क्रीडा महोत्सवात संस्थेच्या १८
शाळांचे संघ सहभागी झाले आहेत. चार गटांमध्ये लांब उडी, धावणे, गोळा फेक अशा स्पर्धा होणार आहेत. जयभवानी आणि जगदंबा संस्थेतील सर्व मुख्याध्यापक, क्रीडाशिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्रीडा महोत्सवाचे आयोजक रणवीर पंडित यांनी स्पर्धेवर जातीने लक्ष दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व क्रीडाशिक्षक मेहनत घेत आहेत. या महोत्सवाचा समारोप ४ जानेवारी रोजी होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis