
छत्रपती संभाजीनगर, 03 जानेवारी (हिं.स.)छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान भारतीय जनता पक्षात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. बंडखोरांची समजूत काढण्यासाठी मंत्री अतुल सावे यांच्यासह भाजपचे खासदार डॉक्टर कराड आणि भाजपाचे आमदार संजय केनेकर यांनी जोरदार फील्डिंग लावली होती
भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवार श्री.दीपक ढाकणे यांच्या उमेदवारी संदर्भातील नाराजी दूर करण्यासाठी भाजपा प्रदेश महामंत्री आमदार संजय केनेकर यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देत सविस्तर, सकारात्मक व विश्वासार्ह संवाद साधला. पक्षाची संघटनात्मक भूमिका, शिस्त आणि आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची स्पष्ट दिशा मांडण्यात आली.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, लोकनेते देवेंद्र फडणवीस दूरदर्शी, निर्णायक व विकासाभिमुख नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी अधिक भक्कमपणे पुढे जात असून, पक्षहित, संघटनात्मक एकता आणि शिस्त हाच भाजपचा खरा बळाचा स्रोत आहे, हा विश्वास या संवादातून दृढ झाला. असे आमदार केेणेकर यांनी सांगितले
-----------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis