भाजपा प्रदेश अध्यक्षांचा आजपासुन उत्तर महाराष्ट्र प्रचार दौरा.
नाशिक, 03 जानेवारी (हिं.स.) : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण आजपासून उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून त्यांच्या प्रचार सभांची सुरुवात आज रविवार दिनांक ४ जानेवारीपासून श्रद्धा लॉन,जुना गंगापूर नाका,हनुमान वाडी रोड,ना
भाजपा प्रदेश अध्यक्षांचा आजपासुन


नाशिक, 03 जानेवारी (हिं.स.) : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण आजपासून उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून त्यांच्या प्रचार सभांची सुरुवात आज रविवार दिनांक ४ जानेवारीपासून श्रद्धा लॉन,जुना गंगापूर नाका,हनुमान वाडी रोड,नाशिक येथून होणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी व नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार यांनी दिली. नाशिक येथील श्रद्धा लॉन येथे कार्यकर्ता मेळावा आयोजनाच्या बैठक प्रसंगी बोलत होते.सदर कार्यकर्ता मेळावा सकाळी नऊ वाजता सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी व्यासपीठावर भारतीय जनता पार्टी उत्तर महाराष्ट्र संघटन महामंत्री व प्रदेश कार्यालय प्रभारी रवीजी अनासपुरे,नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार, महानगर जिल्हा सरचिटणीस सुनील देसाई व रश्मी बेंडाळे,नाना शिलेदार, गोविंद बोरसे उपस्थित होते.पुढे बोलताना विजय चौधरी म्हणाले की सार्वत्रिक निवडणुका म्हणजे लोकशाही बळकटीकरणाचा उत्सव आहे.यासाठी कार्यकर्त्यांनी घराघरापर्यंत जाऊन आपल्या आपल्या परिसरातील मतदान कसे होईल यासाठी प्रयत्न करावे.संघटन सरचिटणीस व कार्यालय प्रभारी रवी अनासपुरे यांनी मंडळ निहाय संघटनेच्या कामाचा आढावा घेतला व उपस्थित पदाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या व आपल्या आपल्या भागातील सामाजिक कार्यकर्ते,व्यावसायिक उद्योजक यांना आपल्या संघटनेची कसे जोडून घेता येईल याकरता सुसंवाद करून त्यांच्या संपर्कात असले पाहिजे व संघटना वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजे असे ते म्हणाले.कार्यक्रमात आपल्या प्रास्ताविक पर भाषणातून अध्यक्ष सुनील केदार यांनी आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा सादर केला.बैठकीचे सूत्रसंचालन सुनील देसाई यांनी केले तर आभार नाना शिलेदार यांनी मानले या बैठकीस पक्षाचे मंडळ अध्यक्ष सरचिटणीस व निवडणूक समन्वय समितीचे पदाधिकारी हजर होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande