
बीड, 03 जानेवारी (हिं.स.)। येथील यशवंतराव नाट्यगृहासाठी ८ कोटींचा निधी मिळाला आहे यामुळे बीड जिल्ह्यातील नाट्यगृह बचाव समितीच्या लढ्याला अखेर यश आले
शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी ८ कोटी १९ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. पालकमंत्री अजितदादा पवार यांनी ही घोषणा केली. बीडच्या कलावंत व रसिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एप्रिल २०२५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक मेळाव्यानंतर नाट्यगृहातील दुरवस्था समोर आली होती. तुटलेल्या काचा, मोडलेल्या खुर्चा, अपुरी विद्युत व्यवस्था, खराब स्वच्छतागृहे यामुळे कलाकार व प्रेक्षक त्रस्त होते. ही बाब आमदार विजयसिंह पंडित, बळीराम गवते यांनी अजितदादांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर अजितदादांनी निधी देण्याचे आश्वासन दिले होते. अखेर निधी मंजूर झाला. या निर्णयाचे नाट्यगृह बचाव समिती, सामाजिक
कार्यकर्ते, नाट्यकलावंतांनी स्वागत केले. नाट्यगृह बचाव समितीने १३ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. निधी न दिल्यास नाट्यगृह बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मुख्याधिकारी यांनी तात्पुरते १० लाख रुपये दिले होते.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis