नवनिर्वाचित बीड नगराध्यक्षा प्रेमलता पारवे यांनी केले पदग्रहण
बीड, 3 जानेवारी, (हिं.स.)। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसंग्राम युतीच्या नवनिर्वाचित बीड नगराध्यक्षा सौ. प्रेमलताताई पारवे यांनी पदभार स्वीकारला आहे छोटेखानी समारंभात त्यांनी पदभार स्वीकारला. बीड नगर परिषद निवडणुकीत शहरातील मतदार बंधू-भगिनीं
बीड


बीड, 3 जानेवारी, (हिं.स.)। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसंग्राम युतीच्या नवनिर्वाचित बीड नगराध्यक्षा सौ. प्रेमलताताई पारवे यांनी पदभार स्वीकारला आहे

छोटेखानी समारंभात त्यांनी पदभार स्वीकारला. बीड नगर परिषद निवडणुकीत शहरातील मतदार बंधू-भगिनींनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवत शहराच्या विकासासाठी काम करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे राजकीय टीका-टिप्पणी टाळून भूतकाळावर चर्चा करण्यापेक्षा शहरातील नागरिकांना शाश्वत विकासाची हमी देत त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करूया, असा विश्वास यावेळी शिवसेनेचे नेते अनिल जगताप यांनी व्यक्त केला.

रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा, वीज यांसारख्या मूलभूत सुविधा सक्षमपणे उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.

याप्रसंगी महायुतीचे शहरातील सर्व पदाधिकारी, नवनिर्वाचित नगरसेवक, मुख्याधिकारी, नगर परिषदेचे अधिकारी-कर्मचारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे कार्यकर्ते तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande