
सोलापूर, 03 जानेवारी (हिं.स.)।
सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालेले आहे. ही निवडणूक चौरंगी ते पंचरंगी अशी होणार असल्याने या निवडणुकीत चांगलीच रंगत पाहायला मिळणार आहे.
प्रभाग क्रमांक 21 मध्ये काँग्रेसचे पॅनल या निवडणुकीत सर्वात मजबूत असे मानले जात आहे. या ठिकाणी माजी स्थायी समिती सभापती रियाज हुंडेकरी हे आपला प्रभाग 18 सोडून 21 मध्ये लढत आहेत. अनुसूचित जातीचे आरक्षण महिला पडल्याने माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे यांनी आपली मुलगी प्रतीक्षा निकाळजे यांना या ठिकाणाहून उमेदवारी घेतली आहे.
ओबीसी महिलेतून काँग्रेस सेवादलचे शहराध्यक्ष भीमाशंकर टेकाळे यांची सून किरण टेकाळे या निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीत काँग्रेस शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी यांची आघाडी झाल्याने प्रभाग 21 मधून शिवसेनेकडून तीन टर्म नगरसेवक राहिलेले भीमाशंकर म्हेत्रे हे पॅनल मध्ये आले आहेत.यामुळे हे पॅनल मजबूत मानले जाते.विरोधात भारतीय जनता पार्टीने दोन उमेदवार बाहेरचे दिल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर आहे. शिवसेनेमधून सुद्धा बाहेरचे उमेदवार आल्याने काँग्रेसला वातावरण चांगले असल्याचे बोलले जाते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड