
चंद्रपूर, 03 जानेवारी (हिं.स.)। एक लाख रुपयाच्या कर्जासाठी शेतकर्याकडून ७४ लाखाची वसुली करणार्या सावकाराच्या जाचापायी मिंथूर येथील शेतकर्याला आपली किडनी विकावी लागली. या शेतकर्याबाबत राज्य सरकारने कुठलीही दखल घेतली नाही. आजपर्यंत पिडीत शेतकर्याची विचारणा केली नाही. यामुळे सरकारला शेतकर्यांच्या वेदनेशी कुठलेही संवेदना नाही. अशी टिका करीत बच्चू कडू यांनी सरकारने पिडीत शेतकरी रोशन कुडे याचे सावकाराने घेतलेले पैसे, शेती परतकरावी अशी मागणी केली असून याबाबत लवकर कारवाई न झाल्याने यापुढे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सरकारला दिला आहे.
आज किडनी विक्री प्रकरणातील पिडीत शेतकरी रोशन कुडे यांच्या मिंथूर या गावातून नागभीड तहसील कार्यालयावर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चात परिसरातील हजारो शेतकरी सहभागी झाले होते. या मोर्चाच्या माध्यमातून रोशन कुळे यांच्यावर अन्याय करणार्या अवैध सावकारांवर व मानवी अवयव तस्करांवर कठोर कारवाई करावी, रोशन कुळे यांना शासकीय नोकरी देण्यात यावी, शेतक-यांना सरसकट कर्जमाफी, पेन्शन, हमीभाव तसेच स्वामीनाथन आयोग लागू करावा, गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्याचे पाणी उन्हाळी धान पिकासाठी तात्काळ सोडण्यात यावे. या मागण्या करण्यात आल्या. या मोर्चाचे नेतृत्व शेतकरी नेते माजी मंत्री बच्चू कडू कॉ. विनोद झोडगे, गीरिष नवघडे, राहुल पांडव, यांच्यासह विविध शेतकरी व सामाजिक संघटनेच्या नेत्यांनी केले.
मोर्चात नागरिक, शेतकरी, युवक, विविध सामाजिक संघटना मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि दोषीवर कठोर कारवाईची मागणीसाठी रोजी मिथुर ते नागमोड तहसील कार्यालयापर्यंत जनआक्रोश पायदळ मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव