उपमुख्यमंत्री पवार - आ. संदीप क्षीरसागरांची पुण्यात भेट
बीड पालिकेत उपनगराध्यक्षपद व विषय समिती सभापतीपदासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रची शक्यता बीड, 03 जानेवारी (हिं.स.) राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर व माजी आमदार सय्यद सलीम यांनी पुण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमं
बीड पालिकेत उपनगराध्यक्षपद व विषय समिती सभापतीपदासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रची शक्यता


बीड पालिकेत उपनगराध्यक्षपद व विषय समिती सभापतीपदासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रची शक्यता

बीड, 03 जानेवारी (हिं.स.) राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर व माजी आमदार सय्यद सलीम यांनी पुण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना आ. संदीप यांनी दोन्ही राष्ट्रवादी व पवार कुटुंब एकत्रीत आले, एकत्रीत लढले तर आनंद आहे. त्यामुळे ताकद वाढेल असे म्हटले. दरम्यान, बीड पालिकेत उपनगराध्यक्षपद व विषय समिती सभापतीपदासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रची शक्यता आहे. अलिकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड दौऱ्यावर होते. या दौऱ्यात आ. संदीप क्षीरसागर यांच्यासोबत होते. त्यांनी पाय पडून दादांचे आशीर्वाद घेतले. तर दादांनी शरद पवार गटाचे खा. बजरंग सोनवणेंनाही हेलीकॉप्टरमधून पुण्यापर्यंत लिफ्ट दिली होती. त्यानंतर आ. संदीप यांनी पुन्हा पुण्यात अजित पवार यांची भेट घेतली. पाणी प्रश्नाच्या मुद्यावर ही भेट घेतल्याचे आ. संदीप क्षीरसागर यांच्याकडून सांगितले गेले असले

तरी यामागे बीड पालिकेतील सत्ता समिकरण असल्याची चर्चा आहे. पालिकेत अजित पवार यांच्या गटाचा नगराध्यक्ष व १९ नगरसेवक आहेत. शिवसेनेचे ३ नगरसेवक त्यांच्यासोबत आहेत. मात्र आकड्यांच्या खेळात उपनराध्यक्षपद व विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी २७ नगरसेवकांची गरज आहे. दुसरीकडे आ. क्षीरसागर यांच्याकडे १२ व ठाकरे गटाचा एक असे १३ सदस्य आहेत तर भाजपचे डॉ. योगेश यांच्याकडे १५ सदस्य आहेत. क्षीरसागर बंधू एकत्रीत आले तर राष्ट्रवादीला धक्का देऊ शकतात.

दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असताना आ. संदीप क्षीरसागर हे थेट उपनगराध्यक्षपद व एक सभापतीपद अशी मागणी करु शकतात. आपल्या पक्षाला उपनगराध्यक्षपद देऊन ठाकरेंच्या सेनेला सभापती पद दिले जाऊ शकते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande