धर्मेंद्र प्रधानांचा नागपूर दौरा : रेशीमबाग आणि दीक्षाभूमीला दिली भेट
नागपूर, 03 जानेवारी (हि.स.) । खासगी शिक्षण संस्थेच्या वार्षिक समारंभात सहभागी होण्यासाठी नागपूर येथे आलेले केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी संघाचे संस्थ
नागपुर के  रेशमबाग स्थित डा हेडगेवार कि समाधीपर  श्रद्धांजलि देते हुए शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान


नागपूर, 03 जानेवारी (हि.स.) । खासगी शिक्षण संस्थेच्या वार्षिक समारंभात सहभागी होण्यासाठी नागपूर येथे आलेले केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार तसेच द्वितीय सरसंघचालक माधवराव सदाशिवराव गोलवलकर (गुरुजी) यांच्या समाधींवर पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचार विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान शनिवारी नागपूर येथील भोसला मिलिटरी स्कूलच्या वार्षिक समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याआधी नागपूर विमानतळावरून ते थेट रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिरात पोहोचले. तेथे त्यांनी परिसराची पाहणी करून डॉ. हेडगेवार तसेच गोलवलकर गुरुजी यांच्या समाधींना श्रद्धांजली अर्पण केली. या प्रसंगी डॉ. हेडगेवार स्मारक समितीचे अधिकारी उपस्थित होते.

यासोबतच धर्मेंद्र प्रधान यांनी दीक्षाभूमीलाही भेट दिली. नागपूर येथील दीक्षाभूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. नागपूर दौऱ्यादरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री भोसला मिलिटरी स्कूलच्या वार्षिक समारंभात सहभागी झाले. तसेच त्यांनी वर्धा रोडवरील कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटचीही पाहणी केली.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande