
छत्रपती संभाजीनगर, 03 जानेवारी (हिं.स.)। डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नव्या वर्षांच्या पहिलयाच महिन्यात ६६ वा दीक्षांत समारंभ, पहिला लोककला महोत्सव, नामविस्तार दिन यासह भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवडयात येत्या सोमवारी (दि.पाच) ६६ वा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला आहे. कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. ’आययर’या राष्ट्रीय संस्थेचे संचालक डॉ.सुनील भागवत हे या सोहळयाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. दुस-या आठवडयात ११ व १२ जानेवारी रोजी पहिला लोककला महोत्सव होणार आहे. चार जिल्हयातील ६३ महाविद्यालयांचे संघ १७ कलाप्रकारात सहभागी होणार आहेत. तर १४ जानेवारी रोजी ३३ वा नामविस्तार दिन साजरा करण्यात येईल. तसेच महात्मा गांधी अध्यासनातर्फे शिबिर (दि दोन), सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त राष्ट्रीय चर्चासत्र (दि.तीन), राष्ट्रीय युवक दिन (दि.१२) तसेच प्रजासत्ताक दिन (दि.२६) आदी कार्यक्रम होणार आहेत. तसेच फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवडयात पदार्थ विज्ञान विभागाची आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis