
सोलापूर, 03 जानेवारी (हिं.स.) महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र गट – ब परीक्षा असल्याकारणाने परिक्षा केंद्राच्या परिसरात दिनांक 4 जानेवारी रोजी सकाळी 8.30 पासून ते दुपारी 13 वाजेपर्यंत परीक्षार्थींना कसलाही अडथळा होऊ नये. या दृष्टीने परीक्षाकेंद्राच्या परिसरात बाहय उपद्रव कमी करणे, परीक्षार्थीना कसलाही अडथळा होऊ नये यादृष्टीने परीक्षेसाठी संबंधित नसलेल्या व्यक्तीस परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करण्यास पायबंद करणे तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरात झेरॉक्स, पॅफेंक्स, इमेल, रेडिओ, इंटरनेट सुविधा भ्रमणध्वनी (मोबाईल), संगणकगणनायंत्र (कॅल्क्युलेटर) व अशा इतर प्रकारच्या स्वरुपातील बाबी विद्यार्थ्यांना पुरवठा करण्यात येई नये आणि सर्वसंबधित शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांचे परीक्षेशीसंबंधीकर्तव्ये चोखपणे आणि कोणताही अडथळा अथवा उपद्रव न होता बजावता यावे म्हणून परीक्षाकेंद्राच्यासभोवताली १०० मीटर परीसरात भारतीय नागरीक सुरक्षासंहिता २०२३चे कलम १६३ लागू करण्यात आले असल्याचे पोलीस उप-आयुक्त, (गुन्हे/विशा), सोलापूर शहर डॉ. अश्विनी पाटील यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड