

नाशिक, 3 जानेवारी (हिं.स.)। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज मुंबई नाका येथील स्मारकात क्रांतीसुर्य महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले. यावेळी उपस्थित बांधवांशी संवाद साधला.
यावेळी मंत्री गिरीश महाजन, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार हिरामण खोसकर, आमदार सरोज आहिरे, डॉ.कैलास कमोद, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, येवला नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, आनंद सोनवणे, संभाजी पवार, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, बाळासाहेब कर्डक, डॉ.हेमलता पाटील, योगेश निसाळ, गोरख बोडके, कविता कर्डक, डॉ.योगेश गोसावी, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, अंबादास खैरे, समाधान जेजुरकर, प्रमोद सस्कर, अमर वझरे, डॉ.श्रीकांत आवारे, संजय खैरनार, प्रसाद सोनवणे, शिवा काळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
*मंत्री छगन भुजबळ यांचे जल्लोषात स्वागत*
गेल्या दोन महिन्यांपूर्वी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर ह्रदय शस्त्रक्रिया करण्यात आली. आज ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने मंत्री छगन भुजबळ हे प्रथमच नाशिकमध्ये आले. यावेळी शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुंबई नाका येथील स्मारकात बहुसंख्येने सहभागी होऊन मंत्री छगन भुजबळ यांचे जल्लोषात स्वागत केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV