
हिंगोली, 03 जानेवारी (हिं.स.) जिल्ह्यातील
आपले सरकार सेवा केंद्राची निवड पारदर्शक होणार आहे
जिल्ह्यातील रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र करिता जाहिरात मागवून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
ग्रामीण भागातील 423 व हिंगोली शहरातील 7 असे एकूण 430 आपले सेवा केंद्राची निवड करण्यात येणार आहे. ही निवड पारदर्शकपणे करण्यात येणार असून याबाबतच्या कोणत्याही अफवाला बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे
आपले सरकार सेवा केंद्रासाठी औंढा नागनाथ -375, वसमत – 437, हिंगोली-482, कळमनुरी -461 व सेनगाव -271 असे एकूण 2026 अर्ज प्राप्त झाले आहेत.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis