
बीड, 3 जानेवारी, (हिं.स.)। छंद जोपासण्यासाठी जिद्दीला तोड नसते हे दाखवून देत राज्यातील वेगवेगळ वेगळ्या ठिकाणच्या ५० दिव्यांनी पंचवीसाव्यांदा ५ हजार ४०० फुट उंचीवरील कळसूबाई शिखरावर पाऊल ठेवले, त्यांनी तिथे नवर्षांचे स्वागत करुन छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयघोष केला. शिवुर्जा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या उपक्रमांचा दहाव्यांदा भाग होवून बीड येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक तथा प्रतिष्ठानचे सचिव कचरू चांभारे यांनी कळसुबाई देवीचे दर्शन केले.
शिवुर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे व सचिव कचरू चांभारे दोघेही पोलिओग्रस्त दिव्यांग असून त्यांना गडकोट भटकंतीचा छंद आहे. या छंदातूनच ते दरवर्षी दिव्यांगांना सोबत घेऊन कळसुबाई शिखर सर करत असतात. यावर्षीच्या ऊर्जा मोहिमेत छत्रपती संभाजी नगर, बीड, पुणे, बुलढाणा, अमरावती, मुंबई, नाशिक, रायगड, ठाणे, लातूर इत्यादी जिल्ह्यातून पन्नास द्व्यिांग सहभागी झाले. . बीड येथील दुर्ग अभ्यासक कचरू चांभारे यांनी मोहिमेमागील भूमिका, देवीचा यांबद्दल इतिहास, गडकोट ऊर्जा कळसुबाई वाटा सविस्तर माहिती सांगितली. ते स्वतः दहाव्यांदा कळसुबाई शिखरावर गेले आहेत.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis