सोलापूरात साखर कारखाने वजनकाटे तपासणीसाठी भरारी पथकाची स्थापना
सोलापूर, 03 जानेवारी (हिं.स.)ऊस वजन काटा कॅलिब्रेशन मध्ये फेरफार करुन ऊस वजन काटामारी केली जाते अशा तक्रारी प्राप्त होत आहे. यासाठी ऊस वजनकाटा कॅलिब्रेशन करुन सील करणे आवश्यक आहे. संबंधित वैधमापन अधिकाऱ्याने वजनकाट्याची तपासणी करतेवेळी शेतकरी संघटन
Collactor kumar


सोलापूर, 03 जानेवारी (हिं.स.)ऊस वजन काटा कॅलिब्रेशन मध्ये फेरफार करुन ऊस वजन काटामारी केली जाते अशा तक्रारी प्राप्त होत आहे. यासाठी ऊस वजनकाटा कॅलिब्रेशन करुन सील करणे आवश्यक आहे. संबंधित वैधमापन अधिकाऱ्याने वजनकाट्याची तपासणी करतेवेळी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन ऊस वजन काटे कॅलिब्रेशन झालेनंतर सील करावेत, अशा सूचनाही ज‍िल्हाध‍िकारी यांनी द‍िल्या आहेत.

साखर कारखान्यांच्या वजनकाटे तपासणी संदर्भात भरारी पथकांमध्ये सुयोग्य अशा शेतकरी प्रतिनिधीचा समावेश तहसिलदार यांनी करावा. तहसिलदार यांनी भरारी पथकातील सदस्यांचे नांव व संपर्क क्रमांक सदर कार्यक्षेत्रातील साखर कारखाना व शेतकरी यांना उपलब्ध होईल अशा प्रकारे प्रसिद्ध करावेत. तसेच तालुकानिहाय पथकाचे नांव व संपर्क क्रमांक या कार्यालयास अवगत करावेत.

भरारी पथकांनी केलेल्या कार्यवाहीबाबत दर पंधरवड्यास अहवाल सादर करावा. सदरचा आदेश हा सोलापूर जिल्ह्याचे हद्दीत लागू राहील, असे पत्रकात नमूद आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande