कोल्हापूरमध्ये होणार तेरावी ‘ACLAP महाराष्ट्र राज्य वार्षिक परिषद’
कोल्हापूर, 03 जानेवारी (हिं.स.) । असोसिएशन ऑफ क्लीनिकल लॅबोरेटरी अनालिसिस अँड प्रॅक्टिशनर्स (ACLAP), महाराष्ट्र यांच्या वतीने कै. अण्णासाहेब करोले स्मृतीपरिषद ही 13 वी ‘ACLAP महाराष्ट्र राज्य वार्षिक परिषद’ दिनांक 10 व 11 जानेवारी 2026 रोजी शिवाजी
एसीएलएपी महाराष्ट्र राज्य वार्षिक परिषद


कोल्हापूर, 03 जानेवारी (हिं.स.) । असोसिएशन ऑफ क्लीनिकल लॅबोरेटरी अनालिसिस अँड प्रॅक्टिशनर्स (ACLAP), महाराष्ट्र यांच्या वतीने कै. अण्णासाहेब करोले स्मृतीपरिषद ही 13 वी ‘ACLAP महाराष्ट्र राज्य वार्षिक परिषद’ दिनांक 10 व 11 जानेवारी 2026 रोजी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील मुख्य इमारतीमागील राजमाता जिजाऊ सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे.

अध्यक्ष प्रशांत गुळेकर आणि सचिव रमेश चौगले यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की या राज्यस्तरीय परिषदेत संपूर्ण महाराष्ट्रातील क्लिनिकल लॅबोरेटरी व्यावसायिकांची समस्या, रुग्णांसाठी उपलब्ध सुविधा, तपासण्या, तांत्रिक प्रगती, नवे संशोधन तसेच शासनस्तरीय धोरणात्मक व कायदेशीर प्रश्न यावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे.

उद्घाटन सत्र शनिवार, 10 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजता सुरू होईल. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. ना. हसन मुश्रीफ, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, एमएस ए एच पी कौन्सिलचे चेअरमन डॉ. उमांजली डमके यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडेल. उद्घाटनानंतर सुप्रसिद्ध रक्तरोग तज्ज्ञ डॉ. वरुण बाफना यांचे रक्तरोगावर व्याख्यान आणि त्यानंतर डॉ. स्नेहलदीप पाटील यांचे बायोकेमिकल तपासणीसंदर्भातील व्याख्यान आयोजित आहेत. कार्यक्रमाच्या समाप्तीपूर्वी श्री संभाजी यादव यांच्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन आहे.

दुसरे सत्र रविवार, 11 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. या सत्रात आरोग्य मंत्री व पालकमंत्री कोल्हापूर नामदार प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडेकर, आरोग्य संचालक दिलीप माने, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय बलुगडे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. परिषदेत वैद्यकीय तपासण्या करणाऱ्या तज्ज्ञ आणि विविध कंपन्यांचे प्रतिनिधी मार्गदर्शन करतील.

परिषद संपल्यानंतर रविवार दुपारी 3 वाजता ACLAP ची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली जाणार आहे. पत्रकार परिषदेला पंडित जाधव, शरद एकल, राजेंद्र निगवे, मुकुंद पानारी, सागर बरगे आणि राजीव पाटील उपस्थित होते.

----------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande