वादविवाद स्पर्धेत लातूरच्या ज्ञानसागर स्कूलचा संघ प्रथम
लातूर, 03 जानेवारी (हिं.स.)। रेणापूर येथील श्रीराम विद्यालयात कै इंदिराबाई गंगाराम आकनगीरे वादविवाद स्पर्धेमध्ये लातूर येथील ज्ञानसागर पब्लिक स्कुलच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. विजयी संघाला १० हजार १०९ रुपये आणि फिरता चषक देऊन गौरवण्यात आले. य
वादविवाद स्पर्धेत लातूरच्या ज्ञानसागर स्कूलचा संघ प्रथम


लातूर, 03 जानेवारी (हिं.स.)। रेणापूर येथील श्रीराम विद्यालयात कै इंदिराबाई गंगाराम आकनगीरे वादविवाद स्पर्धेमध्ये लातूर येथील ज्ञानसागर पब्लिक स्कुलच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. विजयी संघाला १० हजार १०९ रुपये आणि फिरता चषक देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेमध्ये मराठवाडयातील ४० स्पर्धक विद्यार्थी सहभागी झाले होते.

पंचायत समिती रेणापूरचे शिक्षण विस्तार अधिकारी सुदर्शन लहाने यांच्या हस्ते तसेच रेणुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देविदासराव कुटवाड व प्रमुख पाहुणे सुशील कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले. व्यासपीठावर संस्थेचे सचिव अॅड पंडितराव उगीले, उपाध्यक्ष रविकांत अकनगिरे, कोषाध्यक्ष ज्ञानोबा बरुरे , सहसचिव विठ्ठलराव कटके आदी उपस्थिती होती. याप्रसंगी नूतन नगराध्यक्ष शोभा आकनगिरे व सर्व पक्षीय (१७) नूतन नगरसेवकाचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी बोलताना कुलकर्णी म्हणाले की गुणवत्तेची खरी केले. ज्ञानगंगा ग्रामीण भागातील शाळांमधून वाहते आहे संस्काराचे शिंपण खऱ्या अर्थाने या शाळेमध्ये होते श्रीराम विद्यालय माणूस घडवून सुसंस्कार करणारे शैक्षणिक संकुल आहे.

इंदिराबाई गंगाराम अकनगिरे वादविवाद स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे सांघिक प्रथम - स्वराज पोफळे, दुर्गा चव्हाण - ज्ञानसागर स्कूल लातूर - १०१०१ रुरोख व फिरता चषक, द्वितीय श्रेया मोरे, नैतिक मोरे - रेणुका पब्लिक स्कूल रेणापूर - ७००९ रु स्मृती चिन्ह. तृतीय - श्रेयस शिंदे, भक्ती गरड - श्री केशवराज विद्यालय लातूर - ५००१ रु रोख स्मृती चिन्ह, वैयक्तिक प्रथम -काजी सुजाउद्दीन-बाल विद्यामंदिर परभणी- ४००१ रु, स्मृती चिन्ह, द्वितीय - घोडके पूर्वी श्रीराम विद्यालय रेनापुर-३००१ रु. स्मृती चिन्ह. तृतीय गार्गी शेळके ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र लातूर - २००१ रु. उत्तेजनार्थ सायली पाडुळे-संभाजीराव बडगिरे विद्यालय ममदापूर -१००१ रु. उत्तेजनार्थ - प्रांजली मिटकरी - सरस्वती विद्यालय जानवळ १००९ रुपये. या स्पर्धेचे परीक्षण कांबळे, हलकुडे व लातूरकर यांनी केले.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande