लातूरमध्ये रंगला महापालिका निवडणुकीचा पोस्टर वॉर
लातूर, 03 जानेवारी (हिं.स.) लातूर शहरात महापालिका निवडणु कीचे बिगुल वाजले असून पोस्टर वॉरने राजकीय वातावरणतापलं आहे. शहरभर झळकणाऱ्या बॅनर्सवरून एक गोष्ट स्पष्ट दिसते, प्रचारात आघाडी कुणाची आणि दिशाहीनता कुणाची. भाजपकडून केवळ एकाच प्रकारची टॅगलाईन द
Q


लातूर, 03 जानेवारी (हिं.स.) लातूर शहरात महापालिका निवडणु कीचे बिगुल वाजले असून पोस्टर वॉरने राजकीय वातावरणतापलं आहे. शहरभर झळकणाऱ्या बॅनर्सवरून एक गोष्ट स्पष्ट दिसते, प्रचारात आघाडी कुणाची आणि दिशाहीनता कुणाची. भाजपकडून केवळ एकाच प्रकारची टॅगलाईन दिसत असताना, काँग्रेसकडून अधिक टॅगलाईन शहरभर लावल्या गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

भाजपकडून सर्वत्र दिसणारे काय म्हणतंय लातूर अशा एकसारख्या बॅनर्सपलीकडे काँग्रेसने विचारतंय लातूर, रण तापलंय, लातूर आपलंय, जे जे नवं, ते ते लातूरला हवं आता ही सगळी जबाबदारी आपली आहे अशा बहुविध टॅगलाईन्ससह प्रचाराची सुरुवात केली आहे. हे बॅनर्स अमित देशमुख आणि विलासराव देशमुख यांच्या छाया चित्रांसह प्रसिद्ध झाल्याने काँग्रेसचा वारसा, नेतृत्व आणि भविष्याची वाटचाल एकत्र दिसत आहे.

विविध टॅगलाईन्समधून शहराच्या विका सादिशा, लोकसहभाग, जबाबदारीची भावना आणि भविष्याभिमुख दृष्टी मांडली आहे.

काय म्हणतंय लातूर

कमळ कमळ... कमळ..

भाजपाच्या पोस्टर ला काँग्रेसचं जोरदार प्रत्युत्तर !

म्हणतंय लातूर, काँग्रेसला मत देण्यासाठी आहे आतूर.

प्रशासकीय काळात शहरातील पाणी, रस्ते, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांची झालेली दुरवस्था अजूनही नागरिकांच्या स्मर णात आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा समावेशी विकासाचा संदेश पोस्टरमधून ठसठ शीतपणे उमटतो. एकूणच, पोस्टर वॉरच्या पहिल्याच फेरीत प्रचारात वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. लातूरच्या महापालिका निवडणुकीत हा ट्रेंड पुढे किती निर्णायक ठरेल, याची उत्सुकता शहरभर दिसत आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande