स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवनवीन प्रयोग करत राहावेत- आमदार धनंजय मुंडे
बीड, 03 जानेवारी (हिं.स.)। धर्मापुरी, ता. परळी वैद्यनाथ येथील कार्यक्रमात आमदार धनंजय मुंडे यांनी शैक्षणिक गुणवत्तेमध्ये दर्जा कायम ठेवण्यासह राज्य स्तर, राष्ट्रीय स्तर व जागतिक स्तरावर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवनवीन प्रयोग करत राहावेत, असे आवा
स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवनवीन प्रयोग करत राहावेत


बीड, 03 जानेवारी (हिं.स.)।

धर्मापुरी, ता. परळी वैद्यनाथ येथील कार्यक्रमात आमदार धनंजय मुंडे यांनी शैक्षणिक गुणवत्तेमध्ये दर्जा कायम ठेवण्यासह राज्य स्तर, राष्ट्रीय स्तर व जागतिक स्तरावर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवनवीन प्रयोग करत राहावेत, असे आवाहन शिक्षक वृंदांना केले.

शिक्षण महर्षी स्व. गौतम बापू नागरगोजे व स्व. शिवशलामाई नागरगोजे यांच्या पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्ताने जिजामाता विद्यालय धर्मापुरी येथे आयोजित विविध सामाजिक उपक्रमांचा समारोप व शैक्षणिक स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभास आमदार धनंजय मुंडे यांनी उपस्थित राहून उपस्थित नागरिक व विद्यार्थ्यांना संबोधित केले.

याप्रसंगी प्रसिद्ध सिनेकलाकार संदीप पाठक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

स्व. गौतम बापू नागरगोजे यांना राजकारणात पदे मिळवण्याची संधी असताना सुद्धा त्यांनी पदांच्या ऐवजी शैक्षणिक संस्था उभारून ग्रामीण भागात शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या आणि मुंडे कुटुंबाचे दोन पिढ्यांचे ऋणानुबंध आजही कायम आहेत.याचा उल्लेख आमदार मुंडे यांनी केला

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande