परभणी - मतदार जनजागृतीसाठी संकल्पपत्राचे विमोचन
परभणी, 3 जानेवारी (हिं.स.)। परभणी शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक -२०२५ मध्ये शहरातील सर्व प्रभागातील मतदारांचा मतदान प्रक्रियेत सहभाग निश्चित व्हावा, यासाठी संकल्पपत्राचे विमोचन निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर, प्रा. डॉ. ग
परभणी - मतदार जनजागृतीसाठी संकल्पपत्राचे विमोचन


परभणी, 3 जानेवारी (हिं.स.)। परभणी शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक -२०२५ मध्ये शहरातील सर्व प्रभागातील मतदारांचा मतदान प्रक्रियेत सहभाग निश्चित व्हावा, यासाठी संकल्पपत्राचे विमोचन निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर, प्रा. डॉ. गणेश शिंदे यांच्या हस्ते शनिवारीकरण्यात आले.

या संकल्पपत्राद्वारे १५ हजार विद्यार्थी आपल्या आई-वडिलांना मतदान करा असा संदेश पाठवणार आहेत. विमोचन प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंग भोसले, विद्या मुंडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार माचेवाड आदींची उपस्थिती होती. परभणी शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाचा टक्का वाढवा म्हणून शहरातील शाळा, महाविद्यालय, क्लासेस आदी ठिकाणी हे पथक जनजागृती करणार आहेत. यावेळी स्विपचे अरविंद शहाणे, अतुल सामाले, मोहन आल्हाट, प्रफुल्ल शहाणे, प्रा. शिवाजी कांबळे, प्रवीण वायकोस, संजय पेडगावकर, त्र्यंबक वडसकर आदींची उपस्थिती होती. शाहिरी विभागात शाहीर काशिनाथ उबाळे याची उपस्थिती होती.

महानगरपालिकेच्या समोर होय, मी स्वाक्षरी करणार अशा आशयाचा फलक लावला असून यावर निवडणूक अधिकारी नितीन नार्वेकर व प्रा. गणेश शिंदे यांनी स्वाक्षरी करून मोहिमेचा प्रारंभ केला. तसेच 'मी मतदान करणारच' अशा अर्थाचे सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले आहेत. निवडणूक अधिकारी व इतर उपस्थितांनी सेल्फी काढून या मोहिमेचा शुभारंभ केला. प्रत्येक जण फोटो काढत मी मतदान करणार असा संकल्प करत आहेत. शहरातील प्रत्येक नागरिकाचा मतदान प्रक्रियेतील सहभाग सहभाग निश्चित करण्यासाठी आई-वडिलांनी मतदान करावे, असे आवाहन संकल्पपत्राद्वारे विद्यार्थी करणार आहेत. या संकल्पपत्राचे व स्टिकरचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील पंधरा हजार विद्यार्थी यात सहभाग नोंदवणार असून आपल्या आई-वडिलांना मतदान करण्याचे आवाहन करणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande