पालकमंत्री संजय शिरसाट यांची आक्रमक खेळी :अनेकांची ऐन वेळेला माघार
छत्रपती संभाजीनगर, 03 जानेवारी (हिं.स.)।छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान शिवसेना नेते तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आक्रमक खेळी करत विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांना शिवसेनेत प्रवेश दिला एवढेच नव्हे तर बऱ्याच नाट्यमय घडामोडी
महापालिका


छत्रपती संभाजीनगर, 03 जानेवारी (हिं.स.)।छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान शिवसेना नेते तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आक्रमक खेळी करत विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांना शिवसेनेत प्रवेश दिला एवढेच नव्हे तर बऱ्याच नाट्यमय घडामोडी करीत अनेकांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले

उबाठा गटाचे उपशहर प्रमुख श्री. देवा त्रिभुवन यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांसह अधिकृतपणे शिवसेनेमध्ये प्रवेश केला.तसेच प्रभाग क्रमांक २९ येथील उमेदवारी अर्ज मागे घेत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला.हा निर्णय शिवसेनेच्या विचारांवर ठेवलेल्या विश्वासाचे आणि प्रभागातील एकजुटीचे प्रतीक आहे. या पाठिंब्यामुळे प्रभाग क्रमांक २९ मधील विजयाचा मार्ग अधिक भक्कम होणार आहे.

प्रभाग क्रमांक १८ येथील माजी महापौर श्री. गजानन बारवल सौ. प्रभावती बारवल यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांसह उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.व शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा दिला.

प्रभाग क्रमांक २५ येथील श्री.राजेंद्र तोरणमाल व सौ.शुभांगी तोरणमाल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत शिवसेना पक्षात अधिकृत प्रवेश केला. शिवसेनेच्या विचारांवर व नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला.---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande