
परभणी, 3 जानेवारी, (हिं.स.)। तुळजाभवानी साखर कारखाण्याने पहिली उचल ३ हजार रूपये जाहीर करावा, यासाठी पुढाकार घ्यावा तसेच जिल्ह्यातील जी-७ शुगर गंगाखेड, लक्ष्मी नृसिंह साखर कारखाण्याने २ हजार ५०० रूपये प्रति टन दर देऊन शेतकऱ्यांची २५० ते ३५० रू. प्रति टन नुकसान केले आहे. यात पालकमंत्री म्हणून हस्तक्षेप करावा व साखर कारखानदार व शेतकरी यांच्यातील संघर्ष कमी करावा, आदी मागण्यांचे निवेदन ऊस उत्पादक संघर्ष समीतीच्या वतीने पालकमंत्री मेघना साकोरे - बोर्डीकर यांनी देण्यात आले.
या तिन्ही कारखान्यांनी जिल्ह्यातील इतर कारखान्यांप्रमाणे दर जाहीर केला नाही तर लवकरच पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे. तसेच २७२५ प्रती टन पेक्षाकमी भाव असलेल्या साखर कारखान्याला ज्या शेतकऱ्यांनी ऊस दिला आहे, त्यांनीही या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन समीतीच्या वतीने करण्यात आले. दरम्यान याबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन पालकमंत्री बोर्डीकर यांनी दिले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis