हिंगोली जिल्ह्यात 5 जानेवारीपर्यंत गावनिहाय आरक्षण निश्चिती, पोलीस पाटील पदभरती
हिंगोली, 03 जानेवारी (हिं.स.)। पोलीस पाटील पदासाठी हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली 76, सेनगाव 65, कळमनुरी 89, वसमत 57 व औंढा नागनाथ 56 अशा एकूण 343 रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी दि. 5 जानेवारी पर्यंत गावनिहाय आरक्षण निश्च
हिंगोली जिल्ह्यात 5 जानेवारीपर्यंत गावनिहाय आरक्षण निश्चिती, पोलीस पाटील पदभरती


हिंगोली, 03 जानेवारी (हिं.स.)।

पोलीस पाटील पदासाठी हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली 76, सेनगाव 65, कळमनुरी 89, वसमत 57 व औंढा नागनाथ 56 अशा एकूण 343 रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी दि. 5 जानेवारी पर्यंत गावनिहाय आरक्षण निश्चित करण्यात येणार असून दि. 6 ते 7 जानेवारी दरम्यान आक्षेप मागविण्यात येत आहेत.

दि. 8 ते 10 जानेवारी, 2026 या कालावधीत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दि. 12 ते 26 जानेवारी, 2026 या कालावधीत अर्ज मागविण्यात येणार आहेत. अर्जाची छाननी व प्रवेशपत्राचे वाटप दि. 27 ते 30 जानेवारी, 2026 या कालावधीत करण्यात येणार आहे.

यासाठी लेखी परीक्षा दि. 8 फेब्रुवारी, 2026 रोजी घेण्यात येणार आहे. त्याचा निकाल दि. 10 फेब्रुवारी, 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दि. 11 ते 13 फेब्रुवारी या कालावधीत पात्र उमेदवारांची मुलाखत घेऊन अंतिम उमेदवाराची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच पात्र उमेदवारांना दि. 13 फेब्रुवारी, 2026 रोजी नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande