साहित्य लेखनाच्या माध्यमातून परभणीचा नावलौकिक वाढविलेल्या प्रा. झिंगरे यांचा सेवा गौरव
परभणी, 03 जानेवारी (हिं.स.)। परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख प्रा.रविशंकर झिंगरे यांचा सेवागौरव समारंभ महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी मंचावर महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख हेमंतराव जामकर, माजी सभा
आणि


परभणी, 03 जानेवारी (हिं.स.)। परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख प्रा.रविशंकर झिंगरे यांचा सेवागौरव समारंभ महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी मंचावर महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख हेमंतराव जामकर, माजी सभापती विजयराव जामकर, प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य डॉ.रोहिदास नितोंडे, उपप्राचार्य प्रा.नारायण राऊत, प्रा. रविशंकर झिंगरे, अनुपमा झिंगरे, डॉ.सुरेन्द्र येनोरकर, डॉ.विजय कळमसे यांची उपस्थिती होती. यावेळी भेटवस्तू, शॉल,पुष्पहार देऊन प्रा.झिंगरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

यावेळी पुढे बोलताना प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव म्हणाले, प्रा.झिंगरे हे विद्यार्थी प्रिय प्राध्यापक असून त्यांनी आपले अध्यापनाचे कार्य निष्ठेने आणि तत्परतेने केले. साहित्य लेखनाच्या माध्यमातून महाविद्यालय आणि परभणीचा नावलौकिक तर वाढवलाच सोबतच मराठी साहित्याला नवीन आयाम जोडला. विद्यार्थ्यांमध्ये विषयाची गोडी निर्माण करण्यात त्यांचा हातखहोता असेही ते म्हणाले. यावेळी डॉ.केशट्टी यांनी म्हणाले, प्रा.झिंगरे हे सर्वसमावेशक व्यक्तिमत्व आहे. अध्यापन आणि आपले लेखन हा त्यांचा स्थायीभाव राहिलेला आहे. महाविद्यालय, साहित्य आणि वैयक्तिक जीवन यांची सांगड त्यांनी घातली म्हणूनच साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करू शकले असे ते म्हणाले.यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व प्रशासकीय संघटनांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande