
पुणे, 3 जानेवारी (हिं.स.)। वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या २०२६-२७ या कार्यकाळासाठीच्या वार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून, सहा फेब्रुवारी रोजी शिवाजीनगर न्यायालय परिसरात मतदान होणार आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, त्याच दिवशी रात्री निकाल जाहीर केला जाणार आहे.
पुणे बार असोसिएशनच्या आगामी वार्षिक निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जाची विक्री आणि स्वीकृती पाच ते आठ जानेवारीदरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी पाच या वेळेत शिवाजीनगर न्यायालयातील पुणे बार असोसिएशनच्या कार्यालयात होणार आहे. नऊ जानेवारी रोजी दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. १२ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेता येतील. त्यामुळे निवडणुकीचे अंतिम चित्र १२ जानेवारीला स्पष्ट होणार आहे. दरम्यान, ३० जानेवारी रोजी दुपारी चार वाजता अशोका हॉल येथे निवडणूक लढविणारे उमेदवार आपले मनोगत वकिलांसमोर मांडणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु