राज्य ऑम्लिपियाडसाठी पाटोदा येथील शेंडगे, जाधव यांची निवड
लातूर, 3 जानेवारी (हिं.स.)। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय ऑलिंपियाड स्पर्धेसाठी पाटोदा येथील ज्ञान विकास विद्यालयातील दोन शिक्षकांची निवड झाली आहे. लातूर येथे पार पडलेल्या विभागस्तरी
राज्य ऑम्लिपियाडसाठी पाटोदा येथील शेंडगे, जाधव यांची निवड


लातूर, 3 जानेवारी (हिं.स.)। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय ऑलिंपियाड स्पर्धेसाठी पाटोदा येथील ज्ञान विकास विद्यालयातील दोन शिक्षकांची निवड झाली आहे. लातूर येथे पार पडलेल्या विभागस्तरीय स्पर्धांमध्ये रमेश शेंडगे यांनी मराठी ऑलिंपियाडमध्ये विभागात प्रथम क्रमांक पटकावत थेट राज्यस्तरावर मजल मारली आहे. रमेश शेंडगे हे उपक्रमशील व प्रेरणादायी शिक्षक म्हणून परिचित आहेत. स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन करतात. तसेच सहशिक्षक उमाशंकर जाधव यांनी गणित ऑलिंपियाडमध्ये विभागस्तरीय यश मिळवत राज्यस्तरावर प्रवेश मिळवला आहे. गणित विषयातील तज्ज्ञ, संकल्पनात्मक अध्यापन आणि विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी आत्मविश्वास निर्माण करणारे शिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. यशाबद्दल संस्थेचे सचिव धनराज जाधव, मुख्याध्यापक मोरे, प्राचार्य चंद्रशेखर कळसे यांनी अभिनंदन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande