सचिन भेंडे यांचे कंत्राट अद्याप कायम; आरओंच्या निर्णयावर तुषार भारतीयांचा आरोप
अमरावती, 03 जानेवारी (हिं.स.) साईनगर प्रभागातील युवा स्वाभिमान संघटनेचे उमेदवार सचिन भेंडे हे अद्यापही अमरावती महानगरपालिकेचे कंत्राटदार असून, त्यांची उमेदवारी नियमबाह्य असल्याचा दावा भाजपचे उमेदवार तुषार भारतीय यांनी केला आहे. यासंदर्भातील कायदेश
सचिन भेंडे यांचे कंत्राट अद्याप कायम;  आरओंच्या निर्णयावर तुषार भारतीयांचा संशयाचा आरोप


अमरावती, 03 जानेवारी (हिं.स.)

साईनगर प्रभागातील युवा स्वाभिमान संघटनेचे उमेदवार सचिन भेंडे हे अद्यापही अमरावती महानगरपालिकेचे कंत्राटदार असून, त्यांची उमेदवारी नियमबाह्य असल्याचा दावा भाजपचे उमेदवार तुषार भारतीय यांनी केला आहे. यासंदर्भातील कायदेशीर कागदपत्रे त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सादर केली.श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना तुषार भारतीय म्हणाले की, महापालिकेच्या पॅनलवरील कायदे तज्ज्ञ अ‍ॅड. राहुल धर्माधिकारी यांनी दिलेल्या कायदेशीर खुलाशानुसार, सचिन भेंडे यांनी कंत्राट दुसऱ्या कंत्राटदाराला हस्तांतरित केले असले, तरी त्यांच्या करारातील दोष निवारण कालावधी (डिफेक्ट लायबिलिटी पिरियड) अद्याप संपलेला नाही. त्यामुळे ते कायद्याने महापालिकेचे कंत्राटदार ठरतात व अशा स्थितीत त्यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले पाहिजे.तुषार भारतीय यांनी सांगितले की, या कारणावरून त्यांनी सचिन भेंडे यांच्या उमेदवारीवर अधिकृतरीत्या आक्षेप नोंदवला होता. मात्र, भेंडे यांनी कंत्राट हस्तांतरित केल्याचा दावा करत आपल्या नावावर कोणतेही कंत्राट नसल्याचे स्पष्टीकरण दिले. तरीदेखील करारातील अटी लक्षात घेतल्यास त्यांची जबाबदारी अद्याप कायम असल्याचे दस्तऐवज स्पष्ट करतात, असा आरोप भारतीय यांनी केला.दरम्यान, महापालिकेच्या वकिलांकडून अधिकृत कायदेशीर खुलासा होण्यापूर्वीच बडनेरा झोनचे निवडणूक निर्णय अधिकारी (आरओ) दादासाहेब दराडे यांनी सचिन भेंडे यांचे नामांकन वैध ठरवले. त्यामुळे हा निर्णय घाईगडबडीचा व संशयास्पद असल्याचा आरोप तुषार भारतीय यांनी केला.या प्रकरणामुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, याबाबत पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे तुषार भारतीय यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande