चौथी-सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिलला
अमरावती, 03 जानेवारी (हिं.स.) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद तर्फे पुन्हा इयत्ता चौथी व सातवीच्या विद्याथ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार असून, आगामी २६ एप्रिल रोजी राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर एकाच वेळी परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच,
चौथी-सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिलला


अमरावती, 03 जानेवारी (हिं.स.)

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद तर्फे पुन्हा इयत्ता चौथी व सातवीच्या विद्याथ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार असून, आगामी २६ एप्रिल रोजी राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर एकाच वेळी परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच, मागील ३० डिसेंबरपासून चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून दिले आहेत.

राज्य शासनाच्या निर्णयानुसार गेल्या काही वर्षापासून इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात होती. परंतु, दरवर्षी या शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या विद्याथ्यांच्या संख्येत घट होत चालली होती. याशिवाय अनेक शिक्षक संघटनांनी पुन्हा एकदा इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा सुरू करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार २०२६ मध्ये इयत्ता चौथी व सातवी तसेच इयत्ता पाचवी व आठवी या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल रोजी होणार असून, सकाळी ११ ते १२ या वेळेत प्रथम भाषा व गणित या विषयाची, तर दुपारी दोन ते साडेतीन या वेळेत तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी, या विषयांची परीक्षा घेतील जाईल. शिष्यवृत्ती परीक्षेचा अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा सात माध्यमांमध्ये घेणार

शिष्यवृत्ती परीक्षा सात माध्यमांमध्ये घेतली जाणार आहे. त्यात मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलगू आणि कन्नड या माध्यमांचा समावेश आहे. त्यातच चौथीची शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय १ जून २०२५ रोजी दहा वर्षांपेक्षा जास्त नसावे, तर इयत्ता सातवीच्या विद्यार्थी तेरा वर्षांपेक्षा जास्त नसावे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande