राज्यातील लाखो विद्यार्थी ‘अपार आयडी’विना
पुणे, 3 जानेवारी, (हिं.स.)। राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे अपार आयडी यूडायस प्लस प्रणालीमार्फत तयार करण्याच्या सूचना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने दिल्या होत्या. मात्र, १ जानेवारीपर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील ८५.५ टक्के विद्यार्थ्यांचे अ
राज्यातील लाखो विद्यार्थी ‘अपार आयडी’विना


पुणे, 3 जानेवारी, (हिं.स.)। राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे अपार आयडी यूडायस प्लस प्रणालीमार्फत तयार करण्याच्या सूचना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने दिल्या होत्या. मात्र, १ जानेवारीपर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील ८५.५ टक्के विद्यार्थ्यांचे अपार आयडी, ९५ टक्के विद्यार्थ्यांची आधार पडताळणी पूर्ण झाली आहे. मात्र, २९.८० लाख विद्यार्थ्यांनी अद्याप अपार आयडी तयार करण्यासाठी नोंदणीच केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्याची कार्यवाही ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांनी राज्यातील विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करणे, आधार पडताळणीबाबतच्या सूचना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे अपार आयडी यू-डायस प्लस प्रणालीमार्फत काढण्यासाठी सर्व शिक्षणाधिकारी यांना कळवण्यात आले होते. विद्यार्थ्यांना अपार आयडी प्राप्त झाल्यावर विद्यार्थ्यांचे डिजिटल पद्धतीने चाइल्ड ट्रॅकिंग, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अशा बाबीचे संनियंत्रण करता येईल. दि. १ जानेवारी २०२६ रोजीच्या यू-डायस प्लस प्रणालीद्वारे प्राप्त झालेल्या अहवालानुसार राज्यातील १ कोटी ८४ लाख विद्यार्थ्यांचा अपार आयडी तयार करण्यात आला आहे; तर २ कोटी ४ लाख विद्यार्थ्यांची आधार पडताळणी पूर्ण झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande