
बीड, 03 जानेवारी (हिं.स.)।संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेले थोर संत श्री वामनभाऊ महाराज हे लाखो भाविकांसाठी श्रद्धा, विश्वास आणि मार्गदर्शनाचे दीपस्तंभ आहेत. त्यांच्या ५० व्या सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथीनिमित्त, दिनांक ३ ते १० जानेवारी दरम्यान होणाऱ्या यज्ञ सोहळ्याच्या प्रारंभी श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथे महाराजांच्या समाधीस्थळी गडाचे महंत ह.भ.प. विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या उपस्थितीत समाधी पूजा संपन्न झाली
याप्रसंगी आयोजित दिंडी प्रदक्षिणा आणि पालखी सोहळ्यात आमदार सुरेश धस सहभागी झाले .महाराजांचे विचार, त्याग, तपश्चर्या आणि भक्तीमार्गावर आधारित जीवन आजही लाखो भाविकांसाठी प्रेरणादायी आहेत.आजपासून या सुवर्ण महोत्सव सोहळ्याची सुरुवात झाली असून १० जानेवारी रोजी पुण्यतिथी सोहळा पार पडणार आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis