काँग्रेसच्या बदनामीच्या षडयंत्राला १६ जानेवारीला जनताच चोख उत्तर देईल – संभाजीराव पाटील निलंगेकर
लातूर, 3 जानेवारी, (हिं.स.)। काँग्रेसने मला आणि भाजपला बदनाम करण्याचे जाणीवपूर्वक षडयंत्र रचले आहे. मात्र, सत्याचा विजय होईल आणि येत्या १६ जानेवारीला जनताच आपल्या निकालातून या सर्व आरोपांना चोख प्रत्युत्तर देईल, अशा शब्दांत आमदार संभाजीराव पाटील
काँग्रेसच्या बदनामीच्या षडयंत्राला १६ जानेवारीला जनताच चोख उत्तर देईल! – माजी मंत्री तथा आमदार. संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा घणाघात  ​


लातूर, 3 जानेवारी, (हिं.स.)। काँग्रेसने मला आणि भाजपला बदनाम करण्याचे जाणीवपूर्वक षडयंत्र रचले आहे. मात्र, सत्याचा विजय होईल आणि येत्या १६ जानेवारीला जनताच आपल्या निकालातून या सर्व आरोपांना चोख प्रत्युत्तर देईल, अशा शब्दांत आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी विरोधकांवर जोरदार पलटवार केला आहे.

​माध्यमांशी संवाद साधताना निलंगेकर यांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर गंभीर टीका केली. ते म्हणाले की, विकासाच्या मुद्द्यावर लढण्याऐवजी विरोधक केवळ बदनामीचे राजकारण करत आहेत. मात्र, लातूरच्या जनतेला सर्व काही समजत असून ते भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील.

​भाजपच ठरणार 'नंबर वन'!

​आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मोठा विश्वास व्यक्त केला. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्ष हाच एकमेव पर्याय आहे. येणाऱ्या निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल आणि शहराच्या विकासाची सूत्रे हाती घेईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

​ठळक मुद्दे:

​षडयंत्राचा आरोप: काँग्रेसकडून बदनामीचे प्रयत्न होत असल्याचा गंभीर दावा.

निकालाची तारीख: १६ जानेवारीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष.

विकास हाच ध्यास: मनपा निवडणुकीत भाजप बहुमताने विजयी होणार असल्याचा विश्वास.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande