राजधानीत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
नवी दिल्ली, 03 जानेवारी (हिं.स.)। भारतातील पहिल्या महिला शिक्षिका तथा समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कॉपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली
नवी दिल्ली


नवी दिल्ली, 03 जानेवारी (हिं.स.)। भारतातील पहिल्या महिला शिक्षिका तथा समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कॉपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. नवीन महाराष्ट्र सदनातील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

या प्रसंगी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, सहायक लेखा अधिकारी निलेश केदारे, उपअभियंता किरण चौधरी तसेच महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी जीवनाचा आणि शिक्षण तथा समाजसुधारणा क्षेत्रातील त्यांच्या अविस्मरणीय योगदानाचा सर्वांना परिचय करून दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande