चंचल मनावर विजय मिळविण्याची कला गीतेतून स्वामी अद्वैतानंद- चिन्मय
नाशिक, 03 जानेवारी (हिं.स.)। -मन हेच माणसाच्या बंधनाचं आणि मुक्तीचं कारण असल्याचं भगवद्गीता सांगते. गीतेतील या गहन तत्त्वज्ञानावर आधारित विचार मांडत विद्यार्थ्यांना आत्मसंयम, शांतता आणि जीवनातील समतोल यांचे महत्त्व एबीसीडी अद्याक्षरांद्वारे सहज,सु
चंचल मनावर विजय


नाशिक, 03 जानेवारी (हिं.स.)।

-मन हेच माणसाच्या बंधनाचं आणि मुक्तीचं कारण असल्याचं भगवद्गीता सांगते. गीतेतील या गहन तत्त्वज्ञानावर आधारित विचार मांडत विद्यार्थ्यांना आत्मसंयम, शांतता आणि जीवनातील समतोल यांचे महत्त्व एबीसीडी अद्याक्षरांद्वारे सहज,सुंदर भाषेत पटवून देण्याचा प्रयत्न स्वामी अद्वैतानंद यांनी केला. विविध समर्पक उदाहरणांनी विद्यार्थी-शिक्षकही अंतर्मुख झाले. निमित्त होतं, चिन्मय मिशनच्या अमृतमहोत्सवाचं

सेवा,मानवतेच्या विचारांच्या भावनेतून जीवनात आनंद फुलविणाऱ्या चिन्मय मिशनच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी(भोसला)तर्फे व चिन्मय मिशनच्या सहकार्याने मुंजे सभागृहात आज गीता पंचामृत हा विद्यार्थी,शिक्षकांसी संवादात्मक कार्यक्रम झाला. त्यावेळी स्वामी अद्वैतानंद बोलत होते. यावेळी चिन्मय मिशनचे कोईमतूर येथील स्वामी अनुकूलानंद, स्वामी प्रत्ययानंद,तारीणीदेवी,संस्थेचे कार्यवाह मिलिंद वैद्य,राधिका खैरनार हे व्यासपीठावर होते. स्वामी अद्वैतानंद यांनी गीतेतील अर्जुन-श्रीकृष्णांचे संवादाची उदाहरणे दिली. ते म्हणाले, जोश तो सब मै है,मगर होश नही....अशी काहीशी परिस्थिती हे नेहमी दिसत असते. गीतेत आपल्याला संयम,शक्ती,बुध्दीचे महत्व सांगितले आहे.मन सर्वांचेच आहे,पण विचार कसा करायचा हे समजत नाही. श्रीकृष्णाने आपल्याकडे आलेल्या अर्जुनाला कशाप्रकारे मार्गदर्शन करून त्याचे मनपरिवर्तन केले हे अठरा अध्यायांद्वारे गीतेत दिसते. मन चंचल असते ते भटकते ते टाळते पाहिजे सुंदरतेवरच सर्व काही अवलंबून नसते हे सांगतांना त्यांनी आर्य चाणक्य आणि माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची उदाहरणे दिली. त्यानतंर ए ते झेड या अद्याक्षरांचै सोप्या भाषेत महत्व पटवून दिले.मन ठिक असेल तर त्याला आदर,सन्मान मिळतो पण आपण त्याकडे लक्ष देत नाही, हे दुर्देव असल्याचे त्यांनी सांगितले.

देशासाठी जगायला शिका

स्वामी अनुकूलानंद यांनी आपल्या जीवनातील आठवणीना उजाळा दिला. ते म्हणाले, मला पोलिस,सैनिक होऊन देशाची सेवा करायची होती,पण ती संधी मिळाली नाही पण समाजसेवेच्या संधीने मी सध्या काम करत आहे. आपण सेवभाव मनी ठेवला पाहिजे, आपली भारतीय सेना ही धर्मासाठी काम करते अधर्मासाठी नव्हे हे लक्षात ठेवावे. स्वतःसाठी तर कोणीही जगते,आपण देशभक्ती,राष्ट्रनिष्ठा मनी बाळगून त्याप्रमाणे कार्य करावे, इतरांना प्रोत्साहन,प्रेरणादायी ठरेल असे वर्तन करावे, भिती,भयाला जीवनात स्थान देऊ नये,धर्माचा आदर करायला शिकले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

भव्य विचारांबरोबरच मनही हवे मोठे - स्वामी प्रत्ययानंद

उद्धरेदात्मनाऽत्मानं नात्मानमवसादयेत् ।

आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ॥ यांचे महत्व सांगितले. ते म्हणाले,आत्मा म्हणजे मन,मनाने तुम्ही स्वतःचा उध्दार स्वतःच करा. स्वतःला नेहमी प्रश्न विचारले पाहिजे. देहाकडून देवाकडे जातांना मध्ये देशही लागत असतो, त्यामुळे संकुचित वृत्ती दूर सारून भव्य विचाराने जगले पाहिजे. समाजाच्या सीमा तोडून तुम्हाला मोठे व्हायचे आहे हे कुणीही विसरू नये,यासाठी त्यंनी भविष्याची चिंता नको, चांगले काम करा असे सांगितले.

-------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande