
नाशिक, 03 जानेवारी (हिं.स.)।
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना 50 टक्के आरक्षण आहे. नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी रणरागिणींना मैदानात उतरवले आहे. भाजपने सर्वाधिक 118 जणांना उमेदवारी दिली असून, त्यात 62 महिलांचा समावेश आहे. त्यामुळे भाजपकडून 56 पुरुषांना उमेदवारी देण्यात आली आहे. महिला उमेदवारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे.मनसेने 34 उमेदवार जाहीर केले आहेत. त्यांपैकी 18 महिला आहेत. काँग्रेसने 22 उमेदवार जाहीर केले. त्यांपैकी आठ महिला उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने 31 जणांना उमेदवारी दिली. त्यांपैकी 14 महिलांचा समावेश आहे. शिवसेना शिंदे गटाने 80 उमेदवार जाहीर केेले असून, 39 महिलांना संधी दिली आहे. शिवसेना ठाकरे गटाने 82 उमेदवार दिले असून, त्यांपैकी 39 महिला आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV