न्यूझीलंडविरुद्धच्या एकिदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा
शुभमन गिल,अय्यरचे आणि सिराजचे पुनरागमन; बुमराह आणि हार्दिकला विश्रांतीऋतुराज गायकवाड आणि मोहम्मद शमीला संघात स्थान नाही नवी दिल्ली, 03 जानेवारी (हिं.स.) न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी शनिवारी भारतीय संघ जाहीर करण्यात आल
श्रेयस अय्यर


शुभमन गिल,अय्यरचे आणि सिराजचे पुनरागमन; बुमराह आणि हार्दिकला विश्रांतीऋतुराज गायकवाड आणि मोहम्मद शमीला संघात स्थान नाही

नवी दिल्ली, 03 जानेवारी (हिं.स.) न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी शनिवारी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. शुभमन गिल कर्णधारपदी परतला आहे. आणि श्रेयस अय्यर उपकर्णधारपदी असेल. पण सेंटर ऑफ एक्सलन्सकडून फिटनेस प्रमाणपत्र मिळाल्यानंतर अय्यर पुन्हा मैदानात उतरेल असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

नवीन वर्षाची सुरुवात भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी खास ठरणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली मैदानावर परततील. दोघांनीही अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत चमकदार कामगिरी केली. आता ती लय कायम ठेवण्याचा रोहित आणि विराटचा प्रयत्न असेल.

युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडचा या संघात समावेश करण्यात आलेला नाही. रायपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने शानदार शतक झळकावले असले तरी, निवडकर्त्यांनी त्याला वगळले आहे. निवड समितीने हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली आहे. दोघेही फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व करतील.

मोहम्मद सिराज संघात परतला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्यानंतर त्याला दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. तो आता न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. निवड समितीने वेगवान गोलंदाजी विभागासाठी सिराज, अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यावर विश्वास ठेवला आहे. कुलदीप यादव फिरकी आक्रमणाचे नेतृत्व करेल, त्याला स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर साथ देतील. नितीश कुमार रेड्डी यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ११ जानेवारीपासून सुरू होत आहे. पहिला सामना वडोदरा येथे खेळला जाईल. दुसरा सामना १४ जानेवारी रोजी राजकोट येथे खेळला जाईल, तर तिसरा सामना १८ जानेवारी रोजी खेळला जाईल. त्यानंतर दोन्ही संघ पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळतील.

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघः शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली,केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (उपकर्णधार),वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिध कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande