
ठाणे, 03 जानेवारी, (हिं.स.)। : येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होत असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा किंबहुना नागरिकांनी संविधानाने दिलेला अधिकार बजावावा यासाठी लोकमान्यनगर परिसरात जनजागृती करण्यात येथे आहे. आज ठाणे महापालिका शाळा क्र. 05, 22 व 120 च्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती केली. या प्रभात फेरीत शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनानुसार स्वीपच्या उपक्रमाच्या नोडल अधिकारी तथा उपायुक्त मिताली संचेती यांच्या सहकार्याने जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देण्यात आली असून प्रत्येकांनी मतदानाचा हक्क् बजावावा... लोकशाहीचा आधार करु सर्वाधिक मतदान.., आई- बाबा माझ्या भविष्यासाठी मतदान करा. अशा आशयाचे फलक हातात घेवून विद्यार्थ्यांनी मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले.
*स्वीप अंतर्गत प्रभात फेरीचे आयोजन*
लोकमान्य सावरकर प्रभाग समिती स्वीप पथक अंतर्गत छत्रपति शिवाजी विद्यालय, हिंदी ( प्राथमिक व माध्यमिक) मदर मेरी इंग्लिश हायस्कूल, प्राथमिक आणि माध्यमिक या शाळांमधील विद्यार्थ्यांनी निवडणूकीबाबत जनजागृती करणारी प्रभात फेरी छत्रपती शिवाजी शाळा, आंबेवाडी ते रस्ता क्रमांक 22 ते इंदिरा नगर चौक ते मराठा हॉटेलपर्यत ही प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी मतदानाबाबत जनजागृती केली व लोकशाहीने दिलेला अधिकार प्रत्येकाने बजावावा असे आवाहन केले.
तसेच रा.ज. ठाकूर विद्यालय, लोकमान्यनगर पाडा क. 3 च्या विद्यार्थ्यांनी सकाळी 11 ते 12 या वेळेत प्रभात फेरीच्या माध्यमातून नागरिकांना मतदान करण्यात आवाहन केले. रा.ज. ठाकूर शाळा पाडा क्र. 3 ते दत्त् मंदिर ते लाकडी पूल यशोधन कॉलनी ते लक्ष्मी पार्क चौक चैतीनगर या परिसरातून प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी रा.ज. ठाकूर शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर