ठाण्यातील फूले विचार प्रबोधन कट्ट्यावर सावित्रीबाईंची १९५ वी जयंती साजरी
ठाणे, 3 जानेवारी, (हिं.स.)। अठराव्या शतकात महिला शिक्षण आणि समाजसुधारणेचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंती निमित्त ठाण्यातील माळी समाज मंडळाच्यावतीने सावित्रीबाईंच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय स
ठाण्यातील फूले विचार प्रबोधन कट्ट्यावर सावित्रीबाईंची १९५ वी जयंती साजरी


ठाणे, 3 जानेवारी, (हिं.स.)। अठराव्या शतकात महिला शिक्षण आणि समाजसुधारणेचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंती निमित्त ठाण्यातील माळी समाज मंडळाच्यावतीने सावित्रीबाईंच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी ज्ञानज्योती सावित्रीबाई यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

ठाणे कोर्ट नाका येथील जिल्हाधिकारी कार्यालया बाहेरील फुले विचार प्रबोधन कट्टा येथे माळी समाज मंडळाचे अध्यक्ष धर्मेद्र महादेव वाघुले यांच्या माध्यमातुन शनिवारी (ता.०३ जाने. रोजी) सकाळी शिक्षणाची ज्योत घराघरांत पोहोचवणाऱ्या या माऊलीच्या विचारांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी, कोकण पदवीधर मतदार संघाचे भाजप आमदार ॲड. निरंजन डावखरे, संजय वाघुले, भरत चव्हाण, नम्रता जयेंद्र कोळी तसेच उषा विशाल वाघ यांच्यासह माळी समाज मंडळाच्या ठाणे शहर उपाध्यक्षा अनुराधा बाळु राऊत, सरचिटणीस लोकेश सुखदेव घोलप, सहचिटणीस अलका सुदाम सिनलकर आणि मंडळाचे खजिनदार चेतन सुरेश बटवाल आदी पदाधिकाऱ्यांसह माळी समाजातील अनेक समाजबांधव उपस्थित होते. यावेळी सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून २०२६ हे नुतन वर्ष सावित्रीबाईंच्या प्रेरणेने उजळू दे, हे जीवन समाजकार्यासाठी अर्पण करु दे, असा निर्धार माळी समाज बांधवांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande