छ. संभाजीनगर : तीन कोटींचे अमली पदार्थ जप्त
छत्रपती संभाजीनगर, 06 जानेवारी (हिं.स.)। शहरात अंमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी तसेच अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यासाठी पोलिस आयुक्तालयात गुन्हे शाखेअंतर्गत एनडीपीएस पथक तयार करण्यात आले. या पथकाने वर्ष २०२५ मध्ये एकुण २८
छ. संभाजीनगर : तीन कोटींचे अमली पदार्थ जप्त


छत्रपती संभाजीनगर, 06 जानेवारी (हिं.स.)। शहरात अंमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी तसेच अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यासाठी पोलिस आयुक्तालयात गुन्हे शाखेअंतर्गत एनडीपीएस पथक तयार करण्यात आले. या पथकाने वर्ष २०२५ मध्ये एकुण २८९ गुन्हे दाखल केले आहे. या गुन्ह्यांमध्ये तीन कोटी २० लाख ४ हजार ८४५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वर्ष २०२४ च्या तुलनेत १६१ गुन्हे जास्त दाखल करण्यात आले आहे.

शहरात अंमली पदार्थांच्या विक्री व वापरामुळे अनेक घटना समोर आल्या होत्या. तत्कालीन पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांच्या काळात पोलिस आयुक्तालयातंर्गत गुन्हे शाखेच्या अंतर्गत पथक तयार करण्यात आले होते. या पथकाद्वारे अंमली पदार्थ विक्रेत्यांच्या विरोधात कारवाई सुरू करण्यात आली. पोलिस आयुक्त प्रविण पवार यांनी या पथकाचे नेतृत्व पोलिस निरीक्षकाकडे दिली. या पथकाने गेल्या वर्षात पोलिस आयुक्तालयातंर्गत अंमली पदार्थ विरोधी गांजा, नायट्रोसन टॅबलेट, कोडेक्स, कोडीन या औषधींची अवैध रित्या विक्री करणाऱ्या विरोधात प्रभावी कारवाई केली.

तसेच एमडी औषधींसह गांजा विक्री करणाऱ्या विरोधातही कारवाई करण्यात आली. अंमली पदार्थ विक्री करणारे, बाळगणारे, वाहतूक ताब्यात करणाऱ्या इसमांविरोधात कारवाई करण्यात आली. या कारवाईत जानेवारी २०२५ ते नोव्हेंबर पर्यंत २८९ गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत ३१२ जणांना ताब्यात घेण्यात आले. या आरोपींच्या ताब्यातून तब्बल ३ कोटी २० लाख ४ हजार ८४५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande