
रायगड, 06 जानेवारी (हिं.स.)। पाली पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे १:३० वाजता पालीमधील एस.टी. स्टँडजवळ, सुधागड परिसरात एक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. फिर्यादी रा. धोंडसे, पोस्ट नाडसुर, सुधागड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली की, त्यांना अनोळखी आरोपीत क्र. ०१ आणि आरोपीत क्र. ०२ यांनी फसवले आहे.
घटनेनुसार, फिर्यादी यांना आरोपीत क्र. ०२ यांनी आवाज देऊन काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर बसलेल्या आरोपीत क्र. ०१ कडे जावे असे सांगितले. आरोपीत क्र. ०१ ने पोलीस असल्याचे सांगत, फिर्यादी यांची सोन्याची चैन चोरी होऊ शकते असे भांबावून सांगितले आणि ती सुरक्षित ठेवण्यासाठी मातीची कागदी पुडी देऊन वरच्या खिशात ठेवण्याचे निर्देश दिले.
फिर्यादी यांनी आरोपीकडे दिलेल्या पुडीमध्ये प्रत्यक्षात सोन्याची चैन नव्हती. याप्रकारे आरोपीत क्र. ०१ ने फिर्यादी यांची संमतीशिवाय फसवणूक करून सोन्याची चैन घेतली आणि मोटारसायकलवर बसून पसार झाला. या प्रकारामुळे फिर्यादी यांचे मोठे नुकसान झाले. पाली पोलीस ठाण्याचे तपासानंतर, ५ जानेवारी २०२६ रोजी रात्री १०:५३ वाजता आरोपीला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी भारतीय दंड संहिता २०२३ च्या कलम ३१८(४), ३१९(२), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अधिकारी श्री. निकम करीत आहेत.
पाली पोलीसांनी नागरिकांना सावधगिरीचा सल्ला दिला असून, कुणीही अनोळखी व्यक्तीकडून सोन्याच्या दागिन्यांसह आर्थिक व्यवहार करताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. याप्रकारच्या फसवणुकीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये सतर्कता वाढण्याची गरज आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके