अल्पवयीन विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी लातूर पोलिसांचा तात्काळ तपास सुरू
लातूर, 06 जानेवारी (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय, चिंचोलीराववाडी येथील अल्पवयीन विद्यार्थिनी कु. अनुष्का किरणकुमार पाटोळे (वय 12 वर्षे) हिच्या दिनांक 04/01/2026 रोजी झालेल्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे, लातूर
जवाहर नवोदय विद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी लातूर पोलिसांचा तात्काळ, संवेदनशील व पारदर्शक कायदेशीर तपास.*


लातूर, 06 जानेवारी (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय, चिंचोलीराववाडी येथील अल्पवयीन विद्यार्थिनी कु. अनुष्का किरणकुमार पाटोळे (वय 12 वर्षे) हिच्या दिनांक 04/01/2026 रोजी झालेल्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे, लातूर येथे गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या संवेदनशील प्रकरणाचा तपास अत्यंत गांभीर्याने, पारदर्शकपणे व कायद्याच्या चौकटीत करण्यात येत आहे.

दिनांक 05/01/2026 रोजी फिर्यादी किरणकुमार श्रीमंत पाटोळे (रा. टाका, ता. औसा, जि. लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो.स्टे. एमआयडीसी, लातूर येथे गु.र.नं. 04/2026 कलम 108,115(2),3(5) भारतीय न्याय संहिता सह कलम 3(2)(Va),3(1)(r)(s) अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, 1989 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, मयत मुलगी जुलै 2025 पासून जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता सहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती आणि विद्यालयाच्या मुलींचे वसतिगृहात वास्तव्यास होती.तक्रारीत नमूद आरोपींनी मयत अनुष्का हिचा केलेला मानसिक व शारीरिक छळ तसेच इतर बाबी लक्षात घेऊन लातूर पोलिसांनी कोणताही विलंब न करता तपासाची चक्रे तात्काळ फिरवली.

दिनांक 04/01/2026 रोजी दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळ पंचनामा करण्यात आला असून ई-साक्ष अ‍ॅपद्वारे व्हिडिओ व छायाचित्रण करण्यात आले आहे. तसेच महिला पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत इन-कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले असून वैद्यकीय अहवाल, प्रोव्हिजनल कॉज ऑफ डेथ प्रमाणपत्र ताब्यात घेण्यात आले आहे. व्हिसेरा व अन्य नमुने रासायनिक विश्लेषणासाठी पाठविण्याची कार्यवाही सुरू आहे.

प्राथमिक तपासात निष्पन्न झालेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपी पल्लवी सचिन कणसे, लता दगडू गायकवाड यांना दिनांक 06/01/2026 रोजी कायदेशीररीत्या अटक करण्यात आली आहे. आरोपींना मा.न्यायालयासमोर हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपींची दिनांक 09 /01/2026 पावेतो पोलीस कोठडी दिली आहे.

शाळा, वसतिगृह व संबंधित साक्षीदारांचे सविस्तर जबाब नोंदविण्यात आले असून बी.एन.एस.एस. कलम 183 अन्वये न्यायालयीन जबाब नोंदविण्याची कार्यवाही सुरू असून सीसीटीव्ही फुटेज, शाळेचे रजिस्टर, उपस्थिती नोंदी, कर्मचारी जबाब व इतर संबंधित कागदपत्रे हस्तगत करण्यात येत आहे.

या अत्यंत संवेदनशील व समाजमन हेलावून टाकणाऱ्या घटनेत लातूर पोलिसांनी तात्काळ दखल घेत,पीडित कुटुंबाला न्याय मिळावा तसेच नमूद गुन्ह्यातील कोणताही दोषी सुटू नये या उद्देशाने कार्यवाही केली जात असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक, लातूर श्री. अमोल तांबे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली श्री समीर साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर व त्यांचे विशेष पथकाकडून करण्यात येत असून अपर पोलीस अधीक्षक यांच्याकडून सातत्याने देखरेख ठेवण्यात येत आहे.

लातूर पोलीस प्रशासन समाजातील दुर्बल घटक, विद्यार्थी व अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेबाबत अत्यंत कटिबद्ध असून, अशा प्रकारच्या कोणत्याही अमानवी, बेकायदेशीर व अन्यायकारक कृत्यांविरोधात शून्य सहनशीलता Zero Tolerance धोरण राबवित आहे. या प्रकरणात दोषींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande