
रायगड, 06 जानेवारी (हिं.स.)। खालापूर पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे २:३० वाजता खालापूर तालुक्यातील सांगडेवाडी येथील पोतदार ग्लोबल कंपनीच्या वेअरहाऊसमध्ये एक गंभीर अपघात घडला. कामगार रिझवान समसुध्दीन (वय-४५) या व्यक्तीचा शिडीवरून पडून मृत्यू झाला.
घटनेनुसार, आरोपीत वृंदावन, जो कंपनीचा मॅनेजर आहे, त्याने मृतकाला कोणतीही वर्क ऑर्डर किंवा करार न करता उंचावर इलेक्ट्रिशनचे काम करण्यास सांगितले. तसेच सुरक्षा उपाययोजना न करता निष्काळजीपणे कामावर लावल्यामुळे अपघात झाला. मृतकाचा कंपनीच्या वेअरहाऊसमध्ये उंचावर काम करताना पडून मरण पावला आणि त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात समोर आले.
या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून भारतीय दंड संहिता २०२३ च्या कलम १०६(१) अंतर्गत कारवाई सुरु आहे. अधिक तपास पोलीस अधिकारी श्री. जगधने करीत आहेत.पोलीसांनी सांगितले की, कामाच्या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना सुनिश्चित न केल्यामुळे हा अपघात घडला आहे. कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कंपन्यांनी नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा अशा निष्काळजीपणामुळे प्राणहानि होऊ शकते.
या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि कामगार संघटना कंपनीवर निष्काळजीपणाचे आरोप करत आहेत आणि अशा घटनांचा पुनरावृत्ती होऊ नये यासाठी त्वरित कारवाईची मागणी केली आहे. पोलीस आणि प्रशासन यांनी घटनास्थळी जाऊन प्राथमिक तपासणी केली आहे, तसेच मृतकाच्या कुटुंबियांसोबत संपर्क साधून न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके