
नांदेड, 23 फेब्रुवारी (हिं.स.)।
बिलोलीचे नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी मित्रमंडळाच्या वतीने बिलोली तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सन्मान करण्यात आला.जि.प., पं.स. सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हाइस चेअरमनसह विविध पक्षाच्या राजकीय पुढाऱ्यांना एका व्यासपीठावर आणून गाव पुढाऱ्यांना फेटा बांधून पुष्पहार, सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
संतोष कुलकर्णी समर्थकांनी तालुक्यातील गावपुढाऱ्यांच्या कार्याचा केलेला संकल्प प्रत्यक्षात उतरविला आहे. बिलोली तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतीच्या आजी-माजी सरपंच, पसरपंचासह सदस्यांचा गौरव केला. शहराच्या इतिहासात प्रथमच मोठया संख्येने विविध पक्षातील लोकप्रतिनिधी एकाच व्यासपीठावर आले होते. विशेष अतिथी अतिथी म्हणून लक्ष्मणराव ठक्करवाड, सुनील एंबडवार, गणेश पा. शिंपाळकर, गिरीधर पा. डाकोरे आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis