माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम!
अकोला, 23 फेब्रुवारी (हिं.स.)।केंद्रीय राज्यमंत्री माजी खासदार भाजप नेते संजय धोत्रे यांचा 26 फेब्रुवारी गुरुवार रोजी ६७ वाढदिवस असून या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात सेवा समर्पण कार्यक्रम म्हणून साजरा करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. य
Photo


अकोला, 23 फेब्रुवारी (हिं.स.)।केंद्रीय राज्यमंत्री माजी खासदार भाजप नेते संजय धोत्रे यांचा 26 फेब्रुवारी गुरुवार रोजी ६७ वाढदिवस असून या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात सेवा समर्पण कार्यक्रम म्हणून साजरा करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. यानिमित्ताने रक्तदान, जलाभिषेक आणि स्वच्छता अभियान यासह विविध समाजपयोगी कार्यक्रम होणार आहेत. अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, जयंत मसने यांनी दिली. समाजाला समर्पित सेवा समर्पण दिवस म्हणून साजरा साजरा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या २३ मंडळामध्ये विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून हा कार्यक्रम होणार आहे.

जिल्ह्यात आमदार रणधीर सावरकर, पालकमंत्री ऍडव्होकेट आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल विजय अग्रवाल तेजराव थोरात किशोर पाटील, जयश्री फुंडकर, योगेश गोतमारे, कृष्णा चव्हाण पुरुषोत्तम पान झाडे वैशाली शेळके, महापौर शारदा खेडकर,उप महापौर अमोल गोगे, नगराध्यक्ष सुलभाताई दुतोंडे, मायाताई घुले, वैशालीताई पालीवाल, हर्षद साबळे, अंबादास उमाळे राजेश नागमते एडवोकेट रूपाली काकडे, माधव मानकर एडवोकेट देवाशिष काकड, आम्रपाली उपरवट, चंदाताई शर्मा ,वैशालीताई निकम,, संजय गोटफोडे, मंडल अध्यक्ष सरचिटणीस मंडल पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी विविध आघाड्याच्या प्रमुखांच्या नेतृत्वात जिल्ह्यात आणि महानगरात विविध कार्यक्रम होणार आहे..

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande